Pune : रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज- मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला आहे. येत्या 5 नोव्हेंबर रोजी नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते त्यांना प्रदान केला जाणार आहे.

दरवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. २५ हजार रु. रोख, विष्णुदास भावे पदक, स्मृतीचिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रोहिणी हट्टंगडी यांनी सिने नाट्य क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिले असून त्यांनी अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.