Pimpri : अस्तित्व फाउंडेशनतर्फे बालदिन साजरा

एमपीसी न्यूज- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या बालदिनाचे औचित्य साधत पिंपरी-चिंचवड येथील अस्तित्व फाउंडेशनतर्फे शहरातील विविध शाळांमधील बालकांच्या सानिध्यात वेगवेगळे उपक्रम करत बालदिन साजरा करण्यात आला. यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी वेगळे उपक्रम राबवत बाल मनाशी संवाद करण्याचा प्रयत्न केला.

वक्तृत्व, निबंध लेखन, ट्रेन ऑफ थॉट अशा स्पर्धात्मक परीक्षा आयोजित केल्या. या स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील विविध शाळांमधील मुलांनी सहभाग नोंदवला. पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेतन गौतम बेंद्रे होते. बेंद्रे म्हणाले,”मुलांची तार्किक विचार करण्याची क्षमता वाढण्यासाठी त्यांनी कुठला विचार करण्यापेक्षा कसा विचार केला पाहिजे” यावेळी परीक्षक आणि मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ट्रेन ऑफ थॉट या प्रकारांमध्ये वैभवी इंगळे (मातृ विद्यालय) हिने प्रथम, निहिरा कडुसकर (सेंट अँड्र्यू स्कूल) द्वितीय, तर स्वराज गुरमे (एम व्ही स्कूल) याने तृतीय क्रमांक पटकावला.

निबंध लेखन प्रकारामध्ये संचाली भिडे (श्री श्री रविशंकर विद्या मंदिर) प्रथम, कृष्णा चिंचवडे (विद्यानिकेतन स्कूल) द्वितीय, तर हस्ती पटेल (मातृ विद्यालय) तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

वक्तृत्व स्पर्धेमध्ये यश देवगावकर (एस आर व्ही एम मोशी) प्रथम, दीपिका प्रधान (बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल) द्वितीय, शिवदत्त सिंग (मातृ विद्यालय) याने तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीधर अय्यर, अस्मिता कुलकर्णी यांनी काम केले. सूत्रसंचालन शीतल त्रिभुवन यांनी केले.

अरुणा सलीम, शीतल त्रिभुवन, सारिका पासलकर, सुरज बनसोडे, मोहसीन गडकरी, अर्पित सुतार, हुसैन रंगवाला, रितू शर्मा, विशाल डोंगरे, स्वप्नील गाढवे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.