Talegaon Dabhade : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कराळे-पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
एमपीसी न्यूज – गाव पातळीवर काम करणारा कार्यकर्ता हीच पक्षाची खरी ताकद असते. म्हणूनच दादाभाऊ कराळे-पाटील यांच्या सारख्या कार्यकर्त्यांमुळे आम्हालाही ऐंशीव्या वर्षी लढण्याची ताकद मिळते, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले, निमित्त होते सुदवडी गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि माजी उपसरपंच दादाभाऊ विठोबा कराळे-पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक ज्येष्ठ नेते म्हणून सत्कार सोहळ्याचे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दादाभाऊ कराळे-पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, विद्यमान आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष सुनील दाभाडे होते.
सुदवडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शांताराम कराळे पाटील दादाभाऊ कराळे पाटलांनी गेली 70 वर्ष पक्षाचे एकनिष्ठ काम केले. म्हणून सुदवडी गावच्या पक्षाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कारनिमित्त सुदवडी गावचे माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नितीन ताठे, विद्यमान उपसरपंच रमेश कराळे, तरूणांचे मार्गदर्शक सॅंडविक कंपनीचे सिनियर मॅनेजर बाबाजी खेडेकर, माजी सरपंच माणिकराव गाडे, श्रीक्षेत्र भंडारा डोंगराचे विश्वस्त रामभाऊ कराळे पाटील, सुदवडी गावचे पोलीस पाटील वसंतराव कराळे पाटील, माजी सरपंच गोरखनाथ गाडे, तंटामुक्त अध्यक्ष बाळासाहेब तुकाराम कराळे पाटील, माजी सरपंच किसनराव तुकाराम कराळे पाटील, नितीन शिंदे, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती तसेच माजी अध्यक्ष बाळासाहेब सहादु कराळे पाटील, प्रगतशील शेतकरी शिवाजीराव कराळे पाटील, ग्रामपंचायत सदस्य संगीता खेडेकर, वैभव गाडे, सारिका वाळुंजकर, शितल नितीन ताठे, माजी उपसरपंच राजेंद्र कराळे पाटील, सुखदेव कराळे पाटील, माजी सरपंच संभाजी कराळे पाटील, बाळासाहेब बाबुराव खेडेकर, टोमॅटोचे व्यापारी ज्ञानोबा कराळे पाटील, प्रगतशील शेतकरी तानाजी कराळे पाटील आदी हे उपस्थित होते.
सर्वांचे स्वागत राहुल कराळे पाटील यांनी केले तर, आभार भाऊसाहेब कराळे यांनी केले.