Wakad : ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या कामाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज – स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा ममता गायकवाड आणि माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या प्रयत्नातून वाकड परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वेणुनगर परिसरात विरंगुळा केंद्र करण्यात येत आहे. केंद्राच्या कामाचे भूमिपूजन आज (शनिवारी) करण्यात आले. तसेच विनायकदादा गायकवाड युथ फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिक सवलत पासचे वाटप करण्यात आले.

यावेळी नगरसेविका आरती चोंधे, नगरसेवक संदीप कस्पटे, सामाजिक कार्यकर्ते रामदास कस्पटे, पिंपरी-चिंचवड फेडरेशनचे अध्यक्ष  सुदेश राजे, सेक्रेटरी के.सी. गर्ग, अरुण देशमुख, तेजस्विनी ढोमसे व विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व सभासद उपस्तिथ होते. या ठिकणी सुमारे 10 गुंठे जागेवर प्रशस्त असे विरंगुळा केंद्र बांधण्यात येणार असून त्यासाठी सुमारे 1 कोटी 10 लाख रुपये खर्च येणार आहे. विरंगुळा केंद्रात लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. नागरिकांसाठी ओपन जिम, स्वतंत्र गझेबो तसेच उद्यानात अंदाजे 205 मिटर लांबीचा व 1.8 मीटर रुंदीचा ट्रिमिक्स पाथवे तयार करण्यात येणार आहे.

विनायक गायकवाड म्हणाले, वाकड परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सर्वांनी ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्राची मागणी केली होती. ज्येष्ठ नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने हे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र केले जाणार आहे. यामध्ये आपण व्यायामासाठी ओपन जिम, गझीबो, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी व एकाहॉलची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाकरिता स्मार्ट कार्ड आवश्यक केले आहे. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांना बस्थानकात हेलपाटे मारावे लागत असे. ज्येष्ठांना त्रास होत आहे. त्यामुळे आपण याठिकाणी सवलत पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत, असेही गायकवाड म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.