Pune : डीएसकेच्या 13 आलिशान गाड्यांचे लिलाव करण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या महागड्या 13 गाड्यांचा लिलाव करण्याचे आदेश मावळचे प्रांत अधिकारी संदेश कुलकर्णी यांनी दिले.

डीएस कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सध्या ते कारागृहात आहेत.

पोलिसांनी डीएस कुलकर्णी यांच्या अनेक मालमत्ता व 20 आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. सध्या यातील तेरा आलिशान गाड्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. या गाड्यांची किंमत 2 कोटी 86 लाख रुपये इतकी आहे. 15 फेब्रुवारीला या गाड्यांचा लिलाव होणार आहे. लिलाव होणाऱ्या गाड्यांमध्ये पोर्षे, बीएमडब्ल्यू, ऑगस्टा, इनोव्हा, सांट्रो इत्यादी गाड्यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.