Chikhali : महिला दिनानिमित्त चिखलीमध्ये रंगला खेळ पैठणीचा!
एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त माजी महापौर राहुल जाधव यांच्या वतीने महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिलांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी जाधव यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे यांच्या कन्या साक्षी लांडगे, दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष मंगल जाधव, प्रीती बोंडे,संगीता भोसले ,सोनम जांभूळकर तसेच सामाजिक कार्यकर्ते संभाजी घारे,रवी जांभूळकर, महेंद्र मंडलिक, प्रताप भांबे, रवी भुजबळ आदी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्या महिलांना प्रत्येकी लसीडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, सोन्याची नथ व मानाची पैठणी भेट देऊन गौरवण्यात आले तसेच खेळात सहभागी प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
यावेळी बोलताना राहुल जाधव म्हणाले की, प्रत्येक महिलेमध्ये एक आई, एक बहीण, एक पत्नी असते, त्याचप्रमाणे प्रत्येक महिलांमध्ये एक कलाकार पण दडलेला असतो म्हणूनच त्यांच्या कलागुणांना हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी तसेच इतर महिलांमध्ये जागृती करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यानी सांगीतले. यावेळी सर्व महिलांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था राहुल जाधव स्पोर्ट फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली होती.