Talegaon : कुख्यात रमेश पडवळ टोळीतील अट्टल दरोडेखोर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून जेरबंद

Pimpri Chinchwad Crime Branch arrests notorious Ramesh Padwal gangster

तीन जिल्ह्यातील पोलिसांना पाच वर्षांपासून देत होता गुंगारा

एमपीसी न्यूज – पुणे ग्रामीण, रायगड, अहमदनगर येथील पोलिसांना मागील पाच वर्षांपासून गुंगारा देणारा कुख्यात रमेश पडवळ टोळीतील अट्टल दरोडेखोर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या जाळ्यात अडकला आहे. अजय ऊर्फ आज्या ऊर्फ अजित अशोक शिंदे (वय 25, रा. निमगाव दावडी, ता. खेड, जि पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अट्टल दरोडेखोर अजय ऊर्फ अजित ऊर्फ आज्या शिंदे हा खेडमधील पाराडी येथील डोंगरामध्ये निर्जन काटेरी वनामध्ये लपुन छपुन आपले कुटुंबासह वास्तव्य करत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला व नितीन बहीरट यांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी एक पथक आरोपीच्या मागावर रवाना केले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता तो पुण्यामधील खेड तालुक्यातील कुख्यात दरोडेखोर रमेश बाळु पडवळ याच्या टोळीचा सदस्य आहे.

तसेच त्याच्या टोळीने महाराष्ट्र राज्यातील पुणे, अहमदनगर, रायगड जिल्हयामधील विवीध ठिकाणी दरोडे घातले असल्याचे सांगितले.

तळेगाव दाभाडे, खालापूर, मंचर, रांजणगाव, शिरूर, पारनेर, खेड, कोतवाली पोलीस ठाण्यातील गंभीर 11 गुन्ह्यात फरार आरोपी होता. आरोपी अजय हा मागील पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन आपले अस्तित्व लपवून पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या निर्जन ठिकाणी राहत होता.

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने त्याला शिताफीने अटक केली आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला, नितिन बहिरट, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, श्यामसुदंर गुटे, राजेंद्र शेटे, नागेश माळी, भरत माने, दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, मयुर वाडकर, संदिप ठाकरे, सावन राठोड, ज्ञानेश्वर गाडेकर, गणेश मालुसरे, धनंजय भोसले, गोपाळ ब्रम्हांदे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.