Chinchwad : ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ‘दिलीप सोनिगरा ज्वेलर्स’चे पुनःश्च हरी ओम !

Dilip Sonigra Jewelers re-launches Hari Om giving priority to customer safety! :ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत 'दिलीप सोनिगरा ज्वेलर्स'चे पुनःश्च हरी ओम !

एमपीसी न्यूज – दिलीप सोनिगरा ज्वेलर्स हे 100 टक्के हॅालमार्क असलेले सोने खरेदीचे विश्वासार्ह दालन म्हणून प्रसिद्ध आहे. शुद्धतेची हमी आणि विश्वासाचं अतूट नातं जपणाऱ्या दिलीप सोनिगरा ज्वेलर्सने लॉकडाउन नंतर पुन्हा नवी सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ग्राहकांच्या सुरक्षेला विशेष
प्राधान्य दिले आहे.

दिलीप सोनिगरा ज्वेलर्स गेली पन्नास वर्ष ग्राहकांना निरंतर सेवा देणारी शहरातील शहरातील विश्वासार्ह सूवर्ण पेढी आहे. या सुवर्ण पेढीमध्ये नानाविध प्रकारचे दागिने व असंख्य डिझाईन ग्राहकांना पाहता येतात.

स्टडेड दागिने, वेडिंग कॉलेक्शन, अँटिक, प्रेशस स्टोन तसेच विविध प्रकारचे दागिने आणि असंख्य प्रकारच्या डिझाईन एकाच दालनाखाली उपलब्ध असल्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना इतरत्र जाण्याची गरज भासत नाही.

दिलीप सोनिगरा ज्वेलर्सने ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत दुकानांमध्ये सोशल डिस्टंन्सिगचे पालन होईल, याची विशेष काळजी घेतली आहे. ग्राहक दुकानात आल्यानंतर त्यांना मास्क, सॅनिटायजर दिले जाते.

ग्राहक आणि सेल्समन यांच्यात थेट संपर्क येणार नाही याचीही काळजी घेतली जाते. सोने खरेदी म्हंटल की जास्त डिझाईन पाहता याव्यात, अशी ग्राहकांची इच्छा असते.

दिलीप सोनिगरा ज्वेलर्सकडून याची खास काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना सुरक्षितपणे अमर्याद डिझाईन पाहता येतात.

दिलीप सोनिगरा ज्वेलर्सची चिंचवडगांव, तळेगाव, कामशेत, मावळ या ठिकाणी प्रशस्त सोने खरेदी दालन आहेत. कोरोना संसर्गापासून सुरक्षेची सर्व काळजी घेऊन ही दालने मागील एक महिन्यापासून सुरु आहेत.

ग्राहकांची सुरक्षा आणि सोन्याची शुद्धता यांना प्राधान्य देत सोनिगरा ज्वेलर्सने पुनःश्च हरी ओम केला असून ग्राहकांचा त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

100 टक्के हॉलमार्क असलेले दागिने हीच दिलीप सोनिगरा ज्वेलर्सची खरी ओळख आहे.

गेली पन्नास वर्ष आम्ही सुवर्ण व्यवसायात असून ग्राहकांनी आमच्यावर नेहमीच विश्वास दाखवला आहे. लॉकडाउननंतर आम्ही या व्यवसायाला पुन्हा सुरुवात केली आहे.

सोन्याची शुद्धता आमच्यासाठी जेवढी महत्वाची आहे तेवढीच ग्राहकांची सुरक्षा सुद्धा आहे, असे मत दिलीप सोनिगरा यांनी व्यक्त केले आहे.

दिलीप सोनिगरा ज्वेलर्स ( LLP )
चापेकर चौकाजवळ
चिंचवडगाव – 411033
संपर्क क्रमांक – 9325639949 / 50

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.