Maval: कुसगावमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन

Maval: Inauguration of various development works in Kusgaon जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर यांच्या हस्ते कुसगाव ग्रामपंचायतीच्या 81 लाख रूपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा करण्यात आला.

एमपीसी न्यूज- जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर यांच्या हस्ते कुसगाव ग्रामपंचायतीच्या 81 लाख रूपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा करण्यात आला.

गावातील अंतर्गत रस्त्यावर काँक्रिटीकरण, चितोडीयानगर येथील पाईपलाईन, बापूजीबुवा मंदिराचे काँक्रिटीकरण, भैरवनाथ मंदिर काँक्रिटकरण, स्मशानभूमी शेडचे उद्घाटन व वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सरपंच सारिका लालगुडे, उपसरपंच कोमल लालगुडे, माजी सरपंच मुकुंद लालगुडे, जांभूळचे माजी सरपंच संतोष जांभुळकर, कान्हेचे सरपंच विजय सातकर, सातेचे सरपंच विठ्ठल मोहिते, माजी उपसरपंच अनिल मोहिते, सुनील दंडेल, पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विशाल वहिले, गणेश ढोरे, सुयश सांगळे, भाऊसाहेब ढोरे, सुजित माझिरे, सोनुभाऊ चव्हाण, अक्षय रौधळ, उपसरपंच काळू लालगुडे, बंटी लालगुडे, सदस्य गणेश लालगुडे, दत्ता लालगुडे, ग्रामसेवक विद्या लोखंडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.