Pimpri: पालिकेचे उपलेखापाल सिध्दार्थ जगताप यांचे कोरोनामुळे निधन
Pimpri: Municipal Deputy Accountant Siddharth Jagtap dies due to corona मागील 11 जुलैला ताप आल्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये ते पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल मिळाला होता.
एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपलेखापाल सिध्दार्थ जगताप (वय 51) यांचे आज (मंगळवार) पहाटे कोरोनामुळे निधन झाले.
मागील 11 जुलैला ताप आल्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये ते पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल मिळाला होता. त्यानंतर त्यांना महापालिकेच्या भोसरी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दि. 14 जुलै रोजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने वायसीएममध्ये दाखल करण्यात आले होते. आज पहाटे त्यांचे निधन झाल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ते वायसीएममध्ये उपलेखापाल पदाची जबाबदारी सांभाळत होते. महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप व पत्रकार विजय जगताप यांचे ते चुलत बंधू होते.