Pune: वारजे-माळवाडी परिसरातही उद्यापासून अँटीजन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू

Pune: Antigen Rapid Test Center to start from tomorrow in Warje-Malwadi area अँटीजन रॅपिड टेस्टमुळे केवळ एका तासात कोरोनाचे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निदान होते. त्यामुळे ही टेस्ट अत्यंत महत्वपूर्ण आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर वारजे-माळवाडी परिसरातही बुधवारपासून (दि.22) अँटीजन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

पुणे महानगरपालिका वारजे, कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 32 मधील कै. अरविंद बारटक्के हॉस्पिटल अतुलनगर शेजारी वारजे येथे अँटीजन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू होणार आहे. ही चाचणी मोफत असून केवळ एका तासात रिपोर्ट मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी ॠतुराज दीक्षित (एसआय) मो.न. 9011873436, सचिन सावंत (एसआय), मो.न. 9766264005, किरण जाधव (एसआय), मो.न. 7972840680 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ, ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका सायली वांजळे, लक्ष्मी दुधाणे, माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी केले आहे.

अँटीजन रॅपिड टेस्टमुळे केवळ एका तासात कोरोनाचे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निदान होते. त्यामुळे ही टेस्ट अत्यंत महत्वपूर्ण आहे. शहराच्या इतर ठिकाणी अशा प्रकारचे सेंटर सुरू झाले आहेत.

वारजे-माळवाडी परिसरात हे सेंटर सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याला अखेर यश आले. हे सेंटर सुरू करण्यासाठी आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे, सहायक आयुक्त संतोष वारुळे यांनी मदत केली, अशी माहिती दीपाली धुमाळ यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.