Hinjawadi News: विवाहितेच्या फसवणूक प्रकरणी सासू, सासरे, दीर यांच्यासह चौघांवर गुन्हा

Hinjawadi: Four including mother-in-law, father-in-law, brother-in-law charged in cheating case ही घटना 30 जून ते 4 जुलै या कालावधीत पौंड रोड, बावधन येथे घडली आहे. याबाबत 8 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या फसवणूक प्रकरणी सासू, सासरे, दीर आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 30 जून ते 4 जुलै या कालावधीत पौंड रोड, बावधन येथे घडली आहे. याबाबत 8 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासू आशा अनंतराव भोसले, सासरा अनंतराव नीलकंठ भोसले, दीर परेश अनंतराव भोसले (तिघे रा. सप्तशृंगी कॉलनी, भडगाव, जि. जळगाव), दीपक अभिमान पाटील (रा. स्टारगेज सोसायटी, बावधन) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या पर्समधील नेकलेस, गंठण, छोट्या तीन सोनसाखळी, कानातील झुमके, असे 4 लाख 25 हजार रुपये किमतीचे 17 तोळ्यांचे दागिने आरोपी घेऊन गेले.

तसेच आरोपी परेश भोसले याने फिर्यादीच्या सह्या घेऊन त्यांच्याकडील सप्लायर लोकांचे पगार परस्पर केले. जळगाव येथे फिर्यादी व त्यांच्या पतीच्या नावे असलेल्या फ्लॅटवर फिर्यादी यांना आरोपी येऊ देत नाहीत. फिर्यादी यांच्या पतीच्या नावे असलेल्या विम्याची मूळ कागदपत्रे तसेच एका कंपनीने दिलेले दोन कोरे धनादेश व फिर्यादीचे इतर महत्वाचे कागदपत्र विश्वास संपादन करून घेऊन जाऊन फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.