Chinchwad News : नॉव्हेल इन्स्टिटयूटच्या 17 व्या वर्धापनदिनी कोरोना योद्ध्यांचा सत्कार

29 ऑगस्ट 2003 मध्ये स्थापन झालेल्या नॉव्हेल इन्स्टिटयूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च या संस्थेला आज 17 वर्ष पूर्ण झाली आहेत.

एमपीसी न्यूज – आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाला कोरोना साथीपासून दूर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करून नॉव्हेल इन्स्टिटयूटचा 17 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, नगरसेविका व संस्थेच्या उपाध्यक्ष अनूराधा गोरखे, संस्थेचे रिसोर्स मॅनेजर समीर विलास जेऊरकर, संस्थेच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे प्राचार्य वैभव फंड, अमोल गोरखे, शाळेचे ॲडमिन हेड उपस्थित होते.

कोविड -19चे गांभीर्य लक्षात घेऊन या कार्यकमास संस्थेच्या सर्व विभागातील काही  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

29 ऑगस्ट 2003 मध्ये स्थापन झालेल्या नॉव्हेल इन्स्टिटयूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च या संस्थेला आज 17 वर्ष पूर्ण झाली आहेत.

त्यानिमित्याने कोविड -19 या संसर्गजन्य आजाराच्या प्रतिकारासाठी दिवसरात्र कार्यरत असणारे कोविड -19 योध्दा परिचारीका शाहीन खान व रूपाली नाईक यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.

तसेच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता परिसर स्वच्छ ठेवणारे स्वच्छता कर्मचारी गोकूळ भालेराव, मुशिला मोरे, फवारणी कर्मचारी चरण तडसरे, आनंद कदम यांचाही संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देत सत्कार करण्यात आला.

पर्यावरण शुद्धीसाठी व शाळेतील विद्यार्थ्यांना झाडांची माहीती शाळेच्या आवारातच मिळावी, यासाठी शाळेच्या मैदानात रुद्राक्ष, कदंब, सोनचाफा, गुलाबजामून, आंबा, फणस अशा झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यकमाची सुरुवात संस्थेच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे प्राचार्य वैभव फंड यांच्या प्रास्ताविकाने झाली. अध्यक्षीय मनोगत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.