Pune Crime : दीपक मारटकर खून प्रकरणी मारेकर्‍यांना कोयते पुरवणारा पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – पुण्यातील कसबा युवा सेनेचे विभाग प्रमुख दीपक मारटकर यांची बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आता मारेकर्‍यांना कोयते पुरवणार्‍या चंद्रशेखर वाघेल याला अटक केली आहे. त्याने आरोपी सनी कोलते याला दहा हजार रुपयांत तीन कोयते दिले होते.

वाघेल याच्याविरोधात यापूर्वी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हेगारी टोळीशी संबंधित असलेल्यांना तो शस्त्र पुरवठा करत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. अशी माहिती सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी न्यायालयाला दिली. गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे त्यांनी कुठून आणली. त्याची आणि सनी ची ओळख कशी झाली याचा तपास करायचे असल्याचे सांगून सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने वाघेल याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली आहे. फरासखाना पोलिसांनी यापूर्वी अश्विनी सोपान कांबळे ( वय 25, बुधवार पेठ), महेंद्र मदनलाल सराफ (वय 57) आणि निरंजन सागर महंकाळे (वय 19) सनी कोलते, राहुल रागिर, रोहित क्षीरसागर, रोहित कांबळे, संदीप उर्फ मुंगळ्या प्रकाश कोलते (वय 23) आणि लखन मनोहर ढावरे (वय 30) यांना अटक केली. यातील आरोपी महेंद्र सराफ आणि अश्विनी कांबळे त्यांच्या सांगण्यावरून इतर आरोपींनी दीपक मारटकर यांचा खून केला. आरोपींनी दीपक मारटकर यांच्यावर तब्बल 48 वार केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.