Hinjawadi Crime News : निवृत्त लष्करी अधिकाऱ्यास मारहाण; पोलिसात तक्रार दिल्यास पाहून घेण्याची धमकी

एमपीसी न्यूज – एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्यास मारहाण करून त्यांचे दोन दात पाडण्यात आले. तसेच याबाबत पोलिसात तक्रार दिल्यास पाहून घेण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना म्हाळुंगे येथे सोमवारी (दि. 12) रात्री घडली.

नीलेश पाडाळे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. रामचंद्र फकीरचंद्र शर्मा (वय 66,दोघेही रा. स्वास्तिक हाईटस्‌, म्हाळुंगेगाव, पुणे) यांनी मंगळवारी (दि. 13) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा हे 1995 मध्ये लष्करातून निवृत्त झाले आहेत. सध्या ते म्हाळुंगे येथे राहण्यास आहत. नेहमीप्रमाणे फिर्यादी शर्मा हे रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी आपल्या इमारतीच्या टेरेसवर गेले होते.

ते आपल्या नातेवाईकांशी फोनवर बोलत असताना आरोपी तिथे आला. ‘काय बोलताय फोनवर’ अशी विचारणा त्याने फिर्यादी शर्मा यांना केली. त्यांनी आपल्या नातेवाइकांशी बोलत असल्याचे सांगितले असता आरोपी पाडाळे याने शिवीगाळ करीत तोंडावर बुक्‍की मारली.

यामुळे शर्मा यांचे दोन दात पडले. त्यानंतर त्याने लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करीत मोबाइल आणि चष्मा जमिनीवर आपटून फोडून टाकला. ‘पोलिसात तक्रार दिली तर तुझ्याकडे पाहून घेईल, अशी धमकी दिली.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.