Nigdi Crime : विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांवर गुन्हा; एकाला अटक

एमपीसी न्यूज – घरगुती कारणांवरून विवाहितेचा छळ केला. तसेच तिला मुलगी झाल्याने तिला सासरच्या लोकांनी घरात घेतले नाही. याबाबत विवाहितेने पोलिसात धाव घेत सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. हा प्रकार 25 ऑगस्ट 2019 ते 4 नोव्हेंबर 2020 या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडला. कमरअली आमीन दुकानदार (वय 35), आमीन दस्तगीर दुकानदार (वय 70), रेहाना आमीन दुकानदार (वय 60, तिघे रा. निगडी प्राधिकरण), मिनाज अनीस जमादार (वय 30, रा. गोकाक, कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कमरअली याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पीडित विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेच्या लग्नात तिच्या माहेरच्यांना महागड्या वस्तू घेऊन मोठे लग्न करण्यास भाग पाडले. लग्नानंतर विवाहितेला शिवीगाळ करणे, जेवण न देणे, दवाखान्यात न घेऊन जाणे तसेच विवाहितेच्या जाडीवरून घालून पाडून बोलून तिचा छळ केला. विवाहितेला मुलगी झाली म्हणून तिला आरोपींनी घरी घेतले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.