Pune Crime News : कोरेगाव पार्कमध्ये जादा नफ्याच्या बहाण्याने कुटुंबाला 6 कोटींचा गंडा

एमपीसी न्यूज – कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देतो, अशी बतावणी करीत तिघाजणांनी एका कुटुंबाला तब्बल 6 कोटी 9 लाखांचा गंडा घातला. ही घटना सप्टेंबर 2017 ते डिसेंबर 2019 मध्ये घडली.

अनुराग गौतम भाटिया, सरबाशिस बासू आणि अधिराज अमित सिंग (सर्व रा. कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राजेश मोटवानी (वय ५०, रा. वानवडी) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश कुटुंबियासह वानवडीत राहायला आहेत. त्यांची मिनान्स प्रा. लिमटेड कंपनीचे सीईओ अनुराग गौतम यांच्याशी 2017 मध्ये एका हॉटेलमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर भाटिया यांनी राजेशचा विश्वास संपादित केला. त्यानुसार कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा नफा देण्याचे अमिष कंपनीच्या तिन्ही संचालकांनी राजेशा यांना दाखविले.

त्यानुसार राजेश यांनी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या नावाने तब्बल 6 कोटी 9 लाखांची गुंतवणूक केली. जुलै 2019 मध्ये त्यांनी मिनान्स कंपनीकडे नफ्याची मागणी केली. त्यानंतर कंपनीने त्यांना नफ्यासह मुद्दल देण्यास टाळाटाळ करीत फसवणूक केली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.