Today’s Horoscope 15 January 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ
एमपीसी न्यूज - आजचे पंचांग – वार शुक्रवार. …. दि. 15 जानेवारी 2021
- शुभाशुभ विचार — करिदिन.
- आज विशेष – करिदिन.
- राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
- दिशा शूल -पश्चिमेस असेल.
- आजचे नक्षत्र – धनिष्ठा.
- चंद्र राशी – मकर १७.०६ पर्यंत नंतर कुंभ.
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग- क्रीम)
आज दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत काही कारणाने दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील. नोकरीत मात्र वरिष्ठांचे दडपण असेल. फक्त कर्तव्यात प्राधान्य द्यावे लागणार आहे.
वृषभ – ( शुभ रंग- पिस्ता )
नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल. कौटुंबिक वाद दुपारनंतर सामंजस्याने मिटतील. गृहिणी थोरामोठ्यांचे मानपान सांभाळतील.
मिथुन – ( शुभ रंग- सोनेरी)
नोकरीत वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. कोणालाही मोफत सल्ले वाटप करू नका. आज फक्त आपल्या ताटात बघून जेवा.
कर्क – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. वैवाहिक जीवनात संध्याकाळी काही मतभेद होतील. इतरांना दिलेले शब्द पाळावे लागतील. प्रवास आज कंटाळवाणे होणार आहेत.
सिंह- ( शुभ रंग- गुलाबी)
दैनंदिन कामात काही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. भागीदारी व्यवसाय करत असाल तर आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा.
कन्या- ( शुभ रंग- पांढरा)
नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. आज संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचे योग आहेत. ज्येष्ठ मंडळांनी प्रकृतीची पथ्ये पाळावीत. गोळ्या वेळेवर घ्याव्यात.
तूळ – ( शुभ रंग – भगवा)
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. ब्युटी पार्लर्स व सौंदर्य प्रसाधने इत्यादी व्यवसाय तेजीत चालतील.
वृश्चिक- ( शुभ रंग- मोरपिशी)
आज धंद्यातील आवक-जावक सारखीच राहील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. दुपारनंतर कौटुंबिक वातावरण स्नेहपूर्ण राहील. विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता होईल.
धनु – ( शुभ रंग- जांभळा)
आज कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी आवर्जून वेळ काढावा लागणार आहे. आज जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जाईल. तरुण मंडळी जास्तीत जास्त व्हाट्सअप वर बिझी राहतील.
मकर – ( शुभ रंग – निळा)
अविश्रांत मेहनतीच्या जोरावर कार्यक्षेत्रात स्वतःचे महत्त्व सिद्ध कराल. मृदू वाणीने विरोधकांची मने जिंकाल. संध्याकाळी आवडत्या व्यक्तीच्या सहवासात वेळेचे भान विसराल.
कुंभ – ( शुभ रंग- आकाशी )
नोकरदारांना ऑफिसमध्ये साहेबांचे मूड व घरी जोडीदारचेही मुड सांभाळावे लागतील. आज थोडा संयम बाळगा, तुमच्या हितचिंतकांचे ही सल्ले विचारात घ्या.
मीन – ( शुभ रंग – सोनेरी )
तुमचे मनोबल उत्तम राहील. आज तुमच्यातील सकारात्मकता समोरच्या माणसास प्रभावित करेल. रात्रीच्या प्रवासात जागे राहणेच हिताचे राहील. दुपारनंतर एखादी महत्वाची बातमी कळेल
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)