Technology News : ‘सिग्नल’ला मिळतीय वापरकर्त्यांची पसंती

जाणून घ्या ‘सिग्नलला’

एमपीसी न्यूज : व्हॉट्स ॲप प्रायव्हसी पॉलीसीमुळे ‘सिग्नल’ला वापरकर्त्यांची पसंती मिळत आहे. त्यात सिग्नल डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात गेली आहे. भारतात सिग्नल ॲपला चांगलीच पसंती मिळाली असून पेटीएम, महिंद्रा या कंपन्यांनीही व्हॉट्स ॲपला बॅन करण्याचे जाहीर केले आहे. सिग्नलसाठी सर्वांत मोठी बाजारपेठ ही भारत आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर सिग्नलच्या वैशिष्ट्यांकडे पाहणे गरजेचे ठरते.

भारतामध्ये सिग्नल गुगल प्ले स्टोअरवर पहिल्या क्रमांकाचे टॉप फ्री ॲप ठरले आहे. हे ॲप पन्नास करोडच्या आसपास लोकांनी डाऊनलोड केले आहे. ॲपमध्ये आता खास भारतीय वापरकर्त्यांसाठी हिंदी भाषेचा समावेश करण्यात आला आहे. चॅट वॉलपेपर्सदेखील आता ठेवता येणार असून ॲनिमेटेड स्टिकर्सचापण यांत समावेश केला गेला आहे.

ॲपल वापरकर्त्यांसाठी मिडीया म्हणजेच पाठवली जाणारी छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती, डॉक्युमेंट्स, इत्यादी सर्व ऑटो डाऊनलोड करण्याचा आणि फूल स्क्रिन प्रोफाईल फोटो बघण्याचा खास पर्याय दिला आहे. सिग्नलला पैसे डोनेट करण्याचा पर्याय सुद्धा सेटींग्समध्ये देण्यात आला आहे. सुरक्षेचा विचार केला, तर हे ॲप आपण ठेवलेला पिन क्रमांक विचारत असते.

सिग्नल ॲप तुम्ही तुमच्याच जुन्या क्रमांकाने दुस-या डिवाईसवर चालू केले तर तुमचा जुना डाटा, चॅट्स, मिडीया इत्यादी परत दिसणार नाहीत, याची नोंद घ्यावी. परंतु जुन्या डिवाईसचा ॲक्सेस असल्यास तुम्ही तुमचा डाटा ट्रान्सफर करू शकता.

सिग्नल ॲपने त्यांच्या ट्विटर बायोमध्येही बदल केला आहे. पूर्वी Say Hello to Privacy’ इतकाच त्यांचा बायो होता आता ‘सिग्नल हे संदेश देवाण-घेवाणीचे एक माध्यम आहे. प्रायव्हसीला पर्याय नाही- या प्रकारेच सिग्नल काम करते. प्रायव्हसी म्हणजे प्रत्येक संदेश, प्रत्येक कॉल आणि प्रत्येक वेळ’ अशा पद्धतीने अपडेट केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.