Talegaon News : तळेगावात रंगणार टीसीएलचा थरार!

9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान होणार सामने

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे लीग पद्धतीने होणाऱ्या प्लास्टिक बॉल नाईट क्रिकेट स्पर्धेची रंगतदार सुरुवात काल (मंगळवार) पासून येथील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे (पाटील) शाळा क्र. 2 मधील भव्य मैदानावर झाली.

तळेगाव चॅम्पियन लीग कान्होबा क्रिकेट क्लब आयोजित यावर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेचे उद्घाटन तळेगाव दाभाडे नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे व गोरक्षक शिवशंकर राजेंद्र स्वामी यांच्या हस्ते झाले. अशी माहिती आयोजक संतोष किसनराव भेगडे यांनी दिली.

सायंकाळी 8.15 वाजता मैदानाचे पूजन व श्रीगणेश पूजन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार झाल्यानंतर दोन टीमचे मैदानावर संचलन झाले.

प्रत्येक संघासाठी स्वतंत्र संघमालक आणि स्वतंत्र प्रशिक्षक आहेत. महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, ज्येष्ठांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण असणार आहे. साधारणतः पाच हजार प्रेक्षक बसतील एवढी मैदानाची एकूण आसन क्षमता असून तळेगाव चॅम्पियन लीग 2021 सर्वांसाठी विनामूल्य आहे.

तळेगाव आणि मावळ परिसरातील तळेगाव चॅम्पियन लीग सदस्यांचे 08 संघ तयार करण्यात आले असून त्या संघांना किशोरभाऊ भेगडे स्पोर्टस् फाऊंडेशन, गिरीशभाऊ करंडे स्पोर्टस् फाऊंडेशन, मयुरशेठ काळोखे स्पोर्टस् फाऊंडेशन, शुभांगीताई शिंदे स्पोर्टस् फाऊंडेशन, सागर भैय्या बोडके स्पोर्टस् फाऊंडेशन, कल्पेशभाऊ भगत स्पोर्टस् फाऊंडेशन, अभिजित दादा काळोखे स्पोर्टस् फाऊंडेशन, ॠतिकशेठ टकले स्पोर्टस् फाऊंडेशन अशी संघ मालकाच्या नावाने नावे देण्यात आली आहेत.

तसेच प्रत्येक संघास स्वतंत्र झेंडे असून स्वतंत्र आसनव्यवस्था देखील करण्यात आली आहे. मैदानाला आंतरराष्ट्रीय बॉण्ड्रीलाईन करण्यात आली आहे. हे सामने यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रणव भेगडे, चरण भेगडे, ओंकार भेगडे, दीपक भेगडे, साहिल भेगडे, रवींद्र दरेकर, प्रतीक भेगडे, संतोष दिलीप भेगडे या सदस्यांच्या देखरेखीखाली आयोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच विनोद तथा बंटी भेगडे, विनायक वसंत भेगडे, मिथुल काकडे, जेड्याभाऊ मासिहा, नयन भेगडे, बिपीन भेगडे, अक्षय जोशी, मोहिते साऊंड अ‍ॅन्ड लाईट, दत्तात्रय भेगडे, सुधीर सरोदे, संतोष काळोखे आदींचे विशेष सहकार्य लाभले आहे, असेही भेगडे यांनी सांगितले.

तळेगाव चॅम्पियन लीगच्या या सामन्यासाठी विजेता संघासाठी कान्होबा मित्र मंडळाचे मुख्य आधार स्तंभ संतोष किसनराव भेगडे यांच्या वतीने (रूपये 55,555/-) व उपविजेता संघास वडगाव मावळ पंचायत समितीच्या सभापती निकिता नितीन घोटकुले यांच्याकडून (रूपये 33,333/-) देण्यात येणार आहे.

टीसीएलच्या सर्व सामन्यांमध्ये वेगवेगळ्या माध्यमांमधून प्रेक्षकांनी आपला उत्साह दाखविण्याचे आवाहन टीसीएल लीग व आयोजक प्रायोजक कान्होबा क्रिकेट क्लब यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टीसीएलच्या चाहत्यांसाठी विविध माध्यमांमधून प्रक्षेपण
5 एचडी कॅमेऱ्याच्या साहाय्याने मैदानात लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनवर सामने दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रीव्हिव व रिप्लेच्या साहाय्याने सामन्यांच्या प्रक्षेपणात आकर्षकता आणली असून सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण यु ट्यूब चॅनलवर दाखविण्यात येणार आहे.

टीसीएल लीगच्या वतीने ‘टीसीएल’ मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून गूगल प्लेस्टोअर वरून ते डाऊनलोड करता येईल. TCL या युट्युब चॅनेलवर हे सामने विनामूल्य पाहता येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.