Chakan News : तासुबाई डोंगर रांगेतील दुर्गेश्वर कड्यावर गौरव लंघे यांची यशस्वी चढाई

दुर्गेश्वर कड्यावर चढाई करणारे पहिलेच गिर्यारोहक

एमपीसी न्यूज – वांद्रे खिंड, चाकण येथील गडद गावा नजीक उभ्या कातळकड्यात कोरलेल्या पुरातन लेणी आहेत. या लेण्यांमध्ये दुर्गेश्वराचे पुरातन मंदिर आहे. गडद येथील 250 फूट उभ्या कातळ कड्यावर नवोदित गिर्यारोहक गौरव लंघे यांनी यशस्वी चढाई केली आहे. दुर्गेश्वर कड्यावर चढाई करणारे ते पहिलेच गिर्यारोहक ठरले आहेत.

माउंट एव्हरेस्ट व कंचनगंगा शिखरवीर कृष्णा ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नवोदित गिर्यारोहकांनी तासुबाई डोंगर रांगेतील, गडद येथील 250 फूट उभ्या कातळ कड्यावर प्रथम चढाई करून प्रस्तरारोहण मार्ग खुला केला. या कड्याला दुर्गेशवर असे नाव देण्यात आले. कातळ कड्यात कोरलेल्या पुरातन लेणी आहेत. या लेण्यांमध्ये दुर्गेश्वराचे पुरातन मंदिर आहे.

पिंपरी चिंचवड माऊंटेनिअरींग क्लबने नुकतीच प्रस्तरारोहन मोहीम आयोजित केली होती. या अंतर्गत लंघे यांनी हि कामगिरी केली. चढाईची संपूर्ण जबाबदारी गौरवने यांनी पाडली. तर, साहिल कांबळे, सचिन शहा व ओंकार बुर्डे यांनी त्याला सुरक्षा पुरविली. दोन टप्यात ही मोहीम पूर्ण करण्यात आली. या मोहिमेत गौरव लंघे, धनराज साळवी, ओंकार कुटे, सचिन शहा, साहिल कांबळे, ओंकार बुर्डे, अनिकेत जाधव, मालोजी ढोकले, व गडद गावातील स्वप्नील कौदरे, सुमित कौदरे यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.