Chakan Crime News : म्हाळुंगे येथे पादचारी महिलेचा हात धरुन जबरदस्तीने रिक्षात ओढले

एमपीसी न्यूज – चालत घरी जात असलेल्या महिलेला हाताला धरून जबरदस्तीने रिक्षात बसवून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच ‘पोलिसात तक्रार दिल्यास तुम्हाला सोडणार नाही’, अशी धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. 23) दुपारी कॅनफाय चौक, म्हाळुंगे येथे घडली.

याबाबत 26 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश संतोष बामगुडे (रा. नाणेकरवाडी, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास कॅनफाय चौकातून पायी चालत घरी जात होत्या. त्यावेळी आरोपी राजेश याने फिर्यादी यांच्याजवळ रिक्षा उभी केली. फिर्यादीचा हात धरून त्यांना जबरदस्तीने रिक्षात बसवले. त्यानंतर फिर्यादी सोबत गैरकृत्य करून त्यांचा विनयभंग केला.

आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या पतीच्या मोबाईल फोनवर फोन करून पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिली.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87e7dba41e2a21af',t:'MTcxNDgxOTA3NC4wNTkwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();