Pimpri Corona Update : शहरात आज 212 नवीन रुग्णांची नोंद, 202 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 212 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 202 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 4 आणि महापालिका हद्दीबाहेरील 6 अशा 10 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 239 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 54 हजार 738 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 1 हजार 282 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 221 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार 61 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 40 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 428 आहेत. आज दिवसभरात 2 हजार 152 जणांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 5 लाख 35 हजार 679 जणांनी लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.