Mirabai Chanu Wins Medal : ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक ! वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू हिला रौप्यपदक

एमपीसीन्यूज : टोकियो येथे सुरु असलेल्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पहिले पदक पटकावले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात मीराबाई चानू हिने रौप्यपदक मिळवले आहे. तिच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे.

टोकियो येथे सुरु असलेल्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाई चानू हिने भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. तिने वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात रौप्यपदक पटकावले. मीराबाईने शानदार प्रदर्शन करत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो वजन उचलले, तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलत पदकावर शिक्कामोर्तब केले.

मीराबाई चानू हिने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात दुसरे पदक मिळवून दिले आहे. भारताकडून वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

मीराबाई हिच्या या यशानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह दिग्गज नेत्यांनी तिचे अभिनंदन केलं आहे.

पंतप्रधान मोदींनी मीराबाईसोबतचा एक फोटो ट्वीट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही. अवघा भारत मीराबाईच्या कामगिरीनं आनंदी आहे. रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचं अभिनंदन. तिचं यश प्रत्येक भारतीयांना प्रेरीत करेल,

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87dc2f542c5e1cf4',t:'MTcxNDY5NjY3My44NTIwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();