Maval News : शासकीय मदतीबरोबरच वैयक्तिक मदत देऊन आमदार शेळके यांनी पुसले आपदग्रस्त मृत तरुणाच्या कुटुंबीयांचे अश्रू

एमपीसी न्यूज – आपदग्रस्त मृत तरुणाच्या कुटुंबीयांना अवघ्या दोन दिवसांत शासकीय मदत मिळवून देण्याबरोबरच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील मदतीचा हात पुढे करीत संबंधित कुटुंबीयांचे अश्रू पुसले.

मावळ तालुक्यातील शिरदे येथे बबुशा पांडुरंग कोकाटे (वय 23) या तरुणाचा पाण्यात पडून मृत्यू झाला. तो शुक्रवारी सकाळी गुरे चरण्यासाठी रानात गेला होता. तो संध्याकाळी परत न आल्याने कामशेत पोलीस स्टेशनला तो हरवल्याची तक्रार करण्यात आली होती.

सोमवारी (26 जुलै) त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आला. आपदग्रस्त तरुणाच्या कुटुंबीयांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आमदार शेळके यांनी पाठपुरावा केला तसेच शासकीय मदतीबरोबरच वैयक्तिक मदत देऊन वेगळा पायंडा पा़डला.

वडगाव मावळ तहसील कार्यालय येथे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या हस्ते आपदग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांचा आर्थिक सहाय्याचा धनादेश देण्यात आला. या व्यतिरिक्त आमदार सुनीलआण्णा शेळके युवा मंच यांच्या वतीने देखील आर्थिक मदतीचा स्वतंत्र धनादेश मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांकडे देण्यात आला. मृत व्यक्तीचे वडील पांडुरंग देवजी कोकाटे यांच्या नावे हे धनादेश देण्यात आले.

यावेळी आमदार शेळके यांचे बंधू सुधाकर शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव वरघडे, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायण ठाकर, ज्ञानेश्वर लक्ष्मण कोकाटे, सरपंच दिलीप बगाड, पोलीस पाटील हिराताई बगाड, तलाठी सुरेखा माने, नारायण मालपोटे, सिद्धार्थ दाभाडे,अजिंक्य टिळे, पवन भंडारी, किरण ठाकर, अक्षय लोहोट, सागर बोडके आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.