Khed Corona Update : खेड मध्ये नवे 22 रुग्ण; 4 मृत्यू; 17 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यात सोमवारी (दि. 30) 9 गावे आणि 3 पालिकांमध्ये 22 रुग्ण मिळून आले आहेत. तर 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

खराबवाडी येथील 30 वर्षीय महिलेचा, आसखेड बु. येथील 63 वर्षीय पुरुषाचा, चिंबळी येथील 50 वर्षीय पुरुषाचा आणि पाईट येथील 70 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हे मृत्यू मागील काही दिवसातील असून सोमवारच्या दैनंदिन अहवालात ते नमूद करण्यात आले आहे.

खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 34 हजार 356 झाला आहे. यापैकी 33 हजार 565 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. सोमवारी दिवसभरात 17 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 263 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 4 मृत्यूने 528 एवढा झाला आहे. सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 12 रुग्ण, चाकण 1, आळंदी 2, राजगुरुनगर 7 असे एकुण 22 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
अरुडेवाडी, चिंबळी, कणेरसर, मरकळ, वरुडे, नाणेकरवाडी या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे. रेटवडी , दोंदे ,वासुली या गावांमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण मिळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.