Maval News : मावळ तालुका नोटरी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी ॲड. नितीन पवार, सचिवपदी ॲड ओंकार आरते

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन तर्फे मावळ तालुका नोटरी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी ॲड. नितीन उमाकांत पवार तर सचिवपदी ॲड. ओंकार अशोक आरते यांची निवड करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहर, खेड व मावळ तालुका अध्यक्ष ॲड. अतिश लांडगे यांनी त्या संदर्भातील नियुक्तीचे प्रमाणपत्र दिले.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर खेड व मावळ तालुकाचे अध्यक्ष ॲड अतिश लांडगे यांनी त्या संदर्भातील नियुक्तीचे प्रमाणपत्र दिले. सदरचे प्रमाणपत्र मावळचे आमदार सुनिल शेळके यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास ॲड अतिश लांडगे, ॲड. एन.एस.दाभाडे, ॲड विठ्ठल पिंपळे, ॲड ओंकार पवार, ॲड. सोमनाथ पवळे, ॲड सुधिर भोंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.