Vadgaon Maval News : ग्रामपंचायतींनी पोल्ट्री फार्मर्सना लावलेली अवाजवी कर आकारणी कमी करण्यासाठी गटविकास अधिका-यांना निवेदन
एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी पोल्ट्री फार्मर्सना अवाजवी दराने कर आकारणी केली आहे. ती कर आकारणी कमी करावी अशी मागणी पोल्ट्री फार्मर्सनी मावळ तालुका गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्याकडे केली आहे. याबाबत पोल्ट्री फार्मर्सनी भागवत यांना लेखी निवेदन दिले आहे.
यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एम टी कारंडे, पोल्ट्री संघटक सोनबा गोपाळे गुरूजी, पोल्ट्री उद्योजक एकनाथ गाडे, चंद्रकांत खांदवे, गजानन खरमारे, संभाजी केदारी, प्रविण शिंदे, संतोष घारे, सोमनाथ राक्षे, सचिन गरूड, सुभाष केदारी, विनायक बधाले, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदन स्वीकारल्यानंतर गटविकास अधिकारी भागवत यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी करआकारणीबाबत चर्चा केली. तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कर आकारणीची माहिती घेऊन पोल्ट्री व्यावसायिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
पोल्ट्री उद्योजक एकनाथ गाडे, चंद्रकांत खांदवे यांनी संघटनेच्यावतीने सुत्रसंचालन करून आभार मानले.