Vadgaon Maval : कोविड महालसीकरण मोहिमेत भाग घेणाऱ्यांना वडगाव शहर भाजपच्या वतीने पौष्टिक आहाराचे वाटप

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने वडगाव मावळ आरोग्य केंद्रात कोविड महालसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महालसीकरण अभियानात लस घेणाऱ्यांना वडगाव शहर भाजपच्या वतीने पौष्टीक आहाराचे वाटप करण्यात आले.

या वेळी पंचायत समितीच्या सभापती ज्योती शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, भाजप तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, शहर अध्यक्ष अनंता कुडे, नगरसेवक प्रवीण चव्हाण,

किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रसाद पिंगळे, शामराव ढोरे, किरण भिलारे, संभाजी म्हाळसकर, सुधाकर ढोरे, युवक अध्यक्ष विनायक भेगडे, रविंद्र म्हाळसकर, भूषण मुथा, रमेश ढोरे, अमोल धिडे, शेखर वहिले व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मावळ पंचायत समितीच्या वतीने आयोजित केलेल्या महालसीकरण मोहिमेचा वडगाव शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा. कोरोना महामारीला शहरातून हद्दपार करावे, असे मत भाजप  तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.