Nigdi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कामगारांचा सत्कार, मास्क, हँडग्लोजचे वाटप
एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे उपाध्यक्ष समीर जावळकर यांच्या वतीने सफाई कामगार, पोलीस नागरिक मित्र यांचा सत्कार करण्यात आला. गुलाबाची फुले, फळे, मास्क व हँडग्लोजचे वाटप करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण सप्ताह आयोजित केला आहे. त्याअंतर्गत विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड भाजपचे शहर उपाध्यक्ष समीर जावळकर यांच्या वतीने निगडी, प्राधिकरणात विविध कार्यक्रम घेण्यात आले.
सफाई कर्मचारी, पोलीस नागरिक मित्र यांचा सत्कार करण्यात आला. सफाईचे काम करणा-या महिलांना सुरक्षिततेसाठी हँडग्लोजचे वाटप करण्यात आले. तसेच मास्कही देण्यात आले.
या सफाई कर्मचा-यांमुळे शहर स्वच्छ आणि सुंदर राहते. कोरोना काळातही त्यांनी स्वच्छतेचे काम केले. त्यांच्या कार्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे, असे उपाध्यक्ष समीर जावळकर म्हणाले.