Hinjawadi News: अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 27) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास इंदिरा कॉलेज समोर, मुंबई सातारा महामार्गावर घडला.
निषाद लक्ष्मण शेणई (वय 52, रा. सहकारनगर एक, पुणे) असे मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी केशव सदाशिव शिरोडकर (वय 64, रा. परेल, मुंबई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा मयत निषाद हे शनिवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास मुंबई सातारा महामार्गावर इंदिरा कॉलेज समोर रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या निषाद यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.