Maval Corona News : तालुक्यात उरला अवघा एक सक्रिय रुग्ण
एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात गुरूवारी (दि.31) एकाही रूग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर तालुक्यात दिवसभरात एकही जणाला डिस्चार्ज देण्यात आला नाही. सद्यस्थितीत तालुक्यात अवघ्या एका सक्रिय रुग्णावर उपचार सुरू आहेत.
काल एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 32,046 झाली आहे. तर दिवसभरात एकही रुग्ण बरा न झाल्याने घरी सोडण्यात आला नाही. 31,520 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 11,039, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 5,093 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,556 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 17,688 रुग्ण तर ग्रामीण भागात 14,358 रुग्ण आढळून आले आहेत.
एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.36 टक्के आहे तर मृत्यू दर 1.64 टक्के आहे.