Moshi News : मोपेडवरून जाणाऱ्या महिलेची सोन्याची चेन हिसकावली
एमपीसी न्यूज : मोशीमध्ये मोटर सायकलवरून आलेल्यांनी मोपेडवरून जाणाऱ्या महिलेची सोन्याची चेन हिसकावून नेल्याची घटना घडली.
याबाबत एका महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
2 ऑगस्टला रात्री फिर्यादी व त्यांची वाहिनी हे त्यांच्या भाच्यास दवाखान्यातून उपचार करून मोपेडवरून घरी जात होते. रात्री 10.30 च्या सुमारास जय मल्हार हॉटेलचे पुढे तुकाराम महाराज पादुका मंदिरसमोर डुडुळगांव मोशी येथे पोहचल्यावर दोन अनोळखी व्यक्तींनी मोटर सायकलवरून (नंबर माहिती नाही) मागून येऊन फिर्यादीच्या गळ्यातील 30 हजार रुपये किंमतीची 7.5 ग्राम वजनाची सोन्याची चेन हिसका मारून चोरून नेली.