उघड्या पाण्याच्या टाकीत पडल्याने 2 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, बिल्डरसह ठेकेदारावर गुन्हा दाखल
एमपीसी न्युज : बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाण्याच्या उघड्या टाकीमध्ये पडल्याने दोन वर्षीय मृत्यू झाला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मांगडेवाडी परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदाराविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डेटिंग साठी मुलगी शोधणाऱ्या 79 वर्षीय व्यक्तीची 17 लाख रुपयांनी फसवणूक
अंशिका सुनील सहानी (वय 2) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आहे. बांधकाम व्यावसायिक सचिन चोरगे आणि ठेकेदार शिवाजी पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात. मयत मुलीचे वडील सुनील सहानी (वय 27) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांगडेवाडी त्या ठिकाणी सचिन चोरगे यांच्या बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये ही घटना घडली. बिल्डर आणि ठेकेदार यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाण्याच्या टाकीला झाकण न लावल्यामुळे दोन वर्षे अंशिका पाण्यात पडली आणि तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.