Chakan : भरधाव कारची तीन वाहनांना धडक
एमपीसी न्यूज – भरधाव कारने (Chakan) तीन वाहनांना धडक दिली. या अपघात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (दि. 20) सायंकाळी चाकण येथे घडला.
विनोद प्रकाश चव्हाण (वय 40, रा. निघोजे, ता. खेड) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 14 /एचडी 1869 कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime : बंडगार्डन परिसरातील बार व क्लबवर पोलिसांचा छापा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रविवारी सायंकाळी साडेचार (Chakan) वाजता दुचाकीवरून भाजीपाला आणण्यासाठी जात होते. ते रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला समोरून विरुद्ध दिशेने आलेल्या कारने जोरात धडक दिली. त्यात फिर्यादी हे गंभीर जखमी झाले. आरोपी कार चालकाने त्यानंतर पुढे जाऊन आणखी दोन वाहनांना धडक देऊन त्यांचे नुकसान केले आणि तो पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.