Kasaba Result : अभिजित बिचुकले आणि आनंद दवे यांना किती मते मिळाली?

एमपीसी न्यूज – विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत राहणारी (Kasaba Result) दोन व्यक्तिमत्त्वे कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. विविध निवडणुकांचा प्रदीर्घ अनुभव असलेले अभिजित बिचुकले आणि ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे या उमेदवारांबाबत अनेकांना उत्सुकता होती. जाणून घेऊयात…या दोन उमेदवारांना किती मते मिळाली?

अभिजित बिचुकले यांना तीन आकडी मते तर सोडाच पण साधं मतांचं अर्धशतक पण पूर्ण करता आलेलं नाही. बिचुकले यांच्या झोळीत मतदारांनी केवळ 47 मतं टाकली आहे.

भाजपने ब्राह्मण उमेदवार न दिल्याचा निषेध करीत ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांना मतांचं त्रिशतक देखील गाठता आलं नाही. त्यांना (Kasaba Result) केवळ 296 मतांवर समाधान मानावं लागलं आहे.

IND VS AUS : दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांनी पत्करली शरणागती

अ. क्र. उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव मिळालेली मते टक्केवारी
1 रवींद्र धंगेकर काँग्रेस 73,309 52.98
2 हेमंत रासने भाजप 62,394 45.09
3 तुकाराम डफळ सैनिक समाज पार्टी 153 0.11
4 बलजितसिंग कोचर प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी 51 0.04
5 रवींद्र वेदपाठक राष्ट्रीय मराठा पार्टी 41 0.03
6 अनिल हातागळे अपक्ष 108 0.08
7 अभिजित बिचुकले अपक्ष 47 0.03
8 अमोल तुजारे अपक्ष 31 0.02
9 आनंद दवे अपक्ष 297 0.21
10 अजित इंगळे अपक्ष 26 0.02
11 सुरेश ओसवाल अपक्ष 63 0.05
12 खिसल जलाल जाफरी अपक्ष 49 0.04
13 चंद्रकांत मोटे अपक्ष 39 0.03
14 रियाज सय्यद अपक्ष 62 0.04
15 संतोष चौधरी अपक्ष 72 0.05
16 हुसेन शेख अपक्ष 238 0.17
17 नोटा 1401 1.01
एकूण 1,38,381 100

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.