Nigdi Crime News : रुपीनगर येथे तिघांनी कोयत्याने फोडल्या दहा गाड्य़ांच्या काचा

एमपीसी न्यूज – रुपीनगर येथे तिघांनी हातातील कोयत्याने ( Nigdi Crime News) आठ ते दहा गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत. हा प्रकार आज (शनिवारी) पहाटे चारच्या सुमारास सरस्वती शाळेजवळ, रुपीनगर येथे घटना घडली.

 

Pune Crime News : सात सराईतांकडून 17 पिस्टल व 13 काडतुसे जप्त, पुणे पोलिसांची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात तीन जणांनी चिखलीतील सरस्वती शाळेजवळ पार्क केलेल्या वाहनांना लक्ष्य करत वाहनांची तोडफोड केली. यात वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.

कोयता गॅंग पाठोपाठ आता शहरात पुन्हा गाड्या तोडफोडीचे सत्र तोंड वर काढू पहात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिखली पोलीस याचा पुढील तपास ( Nigdi Crime News ) करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.