राजगुरुनगर नगरपरिषदेचे 116 कामगार पुन्हा सेवेत

सामाजिक कार्यकर्ते निलेश कड-पाटील यांच्या प्रयत्नांना यश

एमपीसी न्यूज – राजगुरुनगर नगरपरिषदेने (ता.खेड, जि.पुणे) तत्कालीन राजगुरुनगर ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले 116 कर्मचारी राजगुरुनगरला नगरपरिषद अस्तित्वात येताच कामावरून काढून टाकले होते. परंतु गेली 2 वर्ष सातत्याने सामाजिक कार्यकर्ते निलेश कड-पाटील व त्यांच्या सहकार्यांनी पाठपुरावा करून कामगारांना न्याय मिळवून दिला. आज (दि.10)पासून सर्व कामगार तब्बल दोन वर्षांनी पुन्हा कामावर हजर झाले आहेत.

सर्व कामगारांनी निलेश कड-पाटील यांचा राजगुरुनगर येथे आज विशेष सत्कार केला. निलेश कड-पाटील यांनी याबाबत सांगितले की, न्यायालयाच्या आदेशाने व जिल्हाधिकारी पुणे यांच्या शिष्टाईने आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मध्यस्थीने पुन्हा सर्व 116 कर्मचारी नगरपरिषदेत आज (दि.10) कामावर घेण्यात आले.

त्यानिमित्त राजगुरुनगर शहरात बस स्टॅण्ड ते नगरपरिषद कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून कर्मचारी नगरपरिषदेत पुन्हा कामावर हजर झाले. आता चाकण 98 कर्मचारी व राजगुरुनगर 202 कर्मचारी या सर्व कर्मचारी व कामगारांना नगरपरिषदेमध्ये कायमस्वरुपी समावेशन आदेश पारीत करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने पाठपुरावा चालू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.