Pimpri : रस्त्यावर विनाकारण डांबरीकरण… कशासाठी? काँग्रेसचा सवाल

एमपीसी न्यूज – ‘अ’ प्रभागातील शाहुनगर येथील शिवशंभो चौकातील(Pimpri) अतिशय चांगल्या आणि सुस्थितीत असणाऱ्या रस्त्यावर विनाकारण डांबरीकरण केले जात आहे. चांगल्या रस्त्यावर डांबरीकरण करुन जनतेच्या  कराच्या पैशावर दिवसाढवळ्या डल्ला मारला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष ॲड. अशोक धायगुडे यांनी केला.

धायगुडे यांनी म्हटले आहे की,  रस्ता अतिशय चांगला असताना देखील (Pimpri)डांबरीकरण का केलं जात आहे? याबाबत ठेकेदाराला विचारलं असता, तो म्हणाला आम्हाला माहिती नाही. आम्हाला पालिकेच्या साहेबांनी इथं रस्ता करायला सांगितले आहे.

अ प्रभाग कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. ठेकेदाराने कनिष्ठ अभियंता प्रताप मोरे यांचा नंबर दिला असता, प्रताप मोरे यांना फोनवरून याबद्दल विचारणा केली.

Hinjawadi : सदनिकेत सुरु होता वेश्या व्यवसाय; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई करत केली तीन महिलांची सुटका

यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आणि वरिष्ठांचे नाव सांगून चालढकल केली. वरिष्ठ अभियंता बाळासाहेब शेटे यांना याबद्दल विचारणा केली असता,  त्यांनी देखील सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र काम करण्यासाठी प्रस्ताव कोणी मांडला? याच्याबद्दल त्यांच्याकडे कुठलंच उत्तर नव्हतं.

जनतेच्या कष्टाचा पैसा दरोडा घालुन लुटला जात आहे, वाया घालवला जात आहे. त्याच्याबद्दल त्यांना जाणीव करून दिली असता, त्यांनी ठेकेदाराला फोन करून काम बंद करण्यास सांगितलं. एकदा चांगल्या दर्जाचा रस्ता तयार केला तर त्याला 10-15 वर्ष काहीच होत नाही. भ्रष्टाचार करून निकृष्ठ व सुमार दर्जाची कामं करून, राजरोस जनतेच्या पैशांची लुट केली जात आहे. त्या त्या प्रभागातील तथाकथित लोकप्रतिनिधींना हे जर दिसत नसेल, तर जनतेने येणा-या निवडणूकीत, त्यांचा योग्य तो सन्मान करायलाच पाहिजे. पालिका प्रशासनाला जर आमच्या पैशांची अशीच उधळपट्टी करायची असेल, तर मग कर भरणे ऐच्छिक करावे, असेही ते म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.