Pimpri :  साहित्यसंवाद कार्यक्रमास साहित्यिकांचा उस्त्फूर्त प्रतिसाद

एमपीसी  न्यूज – साहित्यसंवाद म्हणजे साहित्याशी संवाद किंवा संवाद साधण्याचे साहित्य हा धागा पकडून पुन्हा रसिक व साहित्यिक  यांच्यात  संवाद साधण्याचे काम समरसता साहित्य परिषद पिंपरी  चिंचवड शाखेतर्फे सुरू करण्यात आले.
यानिमित्त क्रांतीतिर्थ” ( चापेकर वाडा )येथे नुकत्याच  झालेल्या  उदघाटन  प्रसिद्ध कवयित्री व गझलकार भाग्यश्री कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास ससाप चिंचवड शाखेच्या अध्यक्षा  शोभा  जोशी ,  बाळासाहेब सुबंध ,शिवाजीराव चाळक , नंदकुमार मुरडे , वर्षा बालगोपाल , रामचंद्र मोरे ,सुरेश कंक , दिनेश भोसले , अंतरा देशपांडे  सुनिल पवार आदी  उपस्थित  होते.  यात निसर्ग , पाऊस , स्त्रीमनाचे कंगोरे , भलरी गीत अशा वेगवेगळ्या विषयांच्या कवितांचा  समावेश होता.त्यावर भाष्य करताना ज्येष्ठ  समीक्षक स्वाती ठकार यांनी  अनेक संदर्भ  उलगडून दाखवत कवितेतील सौंदर्यस्थळे दाखवून दिली.

दुस-या  सत्रात प्रकाश निर्मळ यांनी आपली ” कटला ” ही कथा सादर करून मानवी स्वभावाचे विविध कंगोरे  उलगडले.कथेवर भाष्य करताना  प्रसिद्ध साहित्यिक तुकाराम पाटील यांनी कथालेखनाचे अनेक पैलू स्पष्ट केले.कथा लिहिताना लेखकाने आपली कल्पना वास्तवाशी जोडली पाहिजे असे मत व्यक्त केले.
सुहास घुमरे यांनी प्रास्ताविक  केले.मानसी चिटणीस व समृद्धी सुर्वे यांनी सुत्रसंचालन  केले.कैलास भैरट यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.