Wakad : जीवे मारण्याची धमकी देत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या चालकावर गुन्हा
एमपीसी न्यूज – तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन कार चालकाने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. या प्रकरणी मंगळवारी ( दि. 11) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका अठ्ठावीस वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रविंद्र बाजू जगताप (वय 30, रा. तापकीर नगर, काळेवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र हा जुलै 2018 पर्यंत फिर्यादी तरुणीच्या कारवर चालक म्हणून काम करत होता. चालक म्हणून काम करत असताना त्याने तरुणीशी गैरवर्तन केले होते. याबाबत तरुणीने त्यावेळी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्या प्रकरणात त्याला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर नुकताच तो जामिनावर बाहेर आला आहे. जामिनावर बाहेर येताच त्याने पुन्हा तरुणीच्या मोबाईलवर संपर्क करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून तरुणीने पुन्हा वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.