Pune : कुख्यात गुंड संतोष नातु याला अटक ; 3 पिस्तुलासह 10 काडतुसे जप्त
एमपीसी न्यूज- सराईत गुन्हेगार संतोष नातू याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून तब्बल एक लाख सात हजार रुपये किमतीचे बेकायदेशीररित्या बाळगलेले 3 पिस्तूल आणि 10 काडतुसे जप्त करण्यात आली.
संतोष नातु (वय 42, रा. महर्षीनगर पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 28) कर्वेनगर, कोथरूड येथे गस्त घालत असताना कुख्यात गुंड संतोष नातु हा कर्वेनगर येथे पिस्तुल विक्रीसाठी येणार आहे असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी कर्वेनगर येथे सापळा रचून नातू याला अटक केली. त्याच्याकडून तीन देशी बनावटीचे पिस्तूल आणि 10 काडतुसे असा तब्बल एक लाख सात हजारांचा माल हस्तगत केला. संतोष नातु हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून पोलिसांनी यापूर्वी 19 अग्निशस्त्रे व 37 काडतुसे जप्त केली आहेत. तसेच त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापती, बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगणे यांसारखे 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी न्यायालयाने आरोपी संतोषला 4 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.