Nigdi: लायन्स क्लब ऑफ पूना निगडीतर्फे विशेष मुलांना शिकवणा-या शिक्षकांचा सन्मान

एमपीसी न्यूज – सर्वसाधारण मुलांना शिकविणे कठीण  नाही, पण  विशेष मुलांना शिकविणे निश्चितच एक महाकर्म आहे. अशा विशेष मुलांना शिकविणा-या 12 विशेष शिक्षकांचा लायन्स क्लब ऑफ पूना निगडीचे उपप्रांतपाल एम जे एफ ला ओमप्रकाश पेठे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

जागृती अंध मुलींची शाळा आळंदी, पताशाबाई अंध मुलांची शाळा भोसरी, कामायनी विद्या मंदीर निगडी, मूकबधिर विद्यालय चिंचवड, अपंग विद्यालय यमुनानगर, अभिनव विद्यालय जाधववाडी या शाळेतील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  लायन्स क्लब ऑफ पूना निगडीचे अध्यक्ष जनार्दन गावडे होते. याप्रसंगी ला. अशोक येवले व ला. उषा येवले, ला. दिलीपसिंह व मीना  मोहिते, ला. चंद्रशेखर व भाग्यश्री पवार, ला. कुटे, ला. संजय व सविता निंबाळकर, ला. हरी नायर, ला. जाधव, ला. मारूती  मुसमाडे, ला. जयंत व जयश्री मांडे, ला. प्रशांत व मंजिरी कुलकर्णी, ला. नाणिक पंजाबी, ला. सुदाम मोरे, ला. राजू व जयश्री  कोतवाल, ला. अविनाश व गौरी चाळके, ला. दत्ता तरटे आदी उपस्थित होते.

यावेळी उपप्रांतपाल ला. पेठे व तेजश्विनी दहातोंडे यांनी मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ला. दिलीपसिंह व मीना मोहिते, ला. चंद्रशेखर व भाग्यश्री पवार, ला. कुटे, ला. संजय व सविता निंबाळकर, ला. उषा येवले यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन ला. अशोक येवले यांनी केले. तसेच लायन्स क्लब ऑफ पूना निगडीच्या वतीने मळवली येथील अनाथ आश्रमातील अनाथ मुलांसाठी एम जे एफ ला. सुदाम मोरे यांनी 35 हजार रूपयांचे किराणा साहित्य, स्टेशनरी वस्तू दिल्या. मोरे गेल्या 6 वर्षांपासून अनाथ आश्रमासाठी मदत करतात.

आंबेगाव येथील डिंभे आरोग्य केंद्र येथे आदिवासी, वनवासी व गरीब कुटुंबातील कुपोषित बालकांसाठी लायन्स क्लब ऑफ पूना निगडीच्या वतीने बालकांना सकस आहाराची 70 पाकिटे आंबेगाव पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे यांच्याकडे अध्यक्ष लायन जनार्दन गावडे यांनी सुपूर्त केली.

च-होली येथील जगदीशचंद्र महिंद्रा माध्यमिक विद्यालयातील मुलींना लायन्स क्लब ऑफ पूना निगडीच्या महिला सदस्य ला. उषा येवले, ला. सविता निंबाळकर व ला. जयश्री मांडे यांनी सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले. शाळेचे मुख्याधापक विजय हगवणे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शिक्षिका निशीगंधा याही उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.