Lonavala : गुरव समाजाचे एक दिवसीय धरणे आंदोलन
एमपीसी न्यूज – गुरव समाजाच्या विविध मागण्यांकरिता अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला गुरव समाजाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शिर्के, जिल्हा पालक संतोष वाघमारे देवस्थान समिती प्रमुख धनंजय दरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण राजगुरू यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.