Hinjawadi : ज्येष्ठ नागरिकाला लाखोंचा गंडा
एमपीसी न्यूज- मोटारीचा व्यवहार करून मोटार तसेच मोटारीचे पैसे परत न देता ज्येष्ठ नागरिकाला साडे तीन लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी रविवारी (दि.7) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
राजन दत्तात्रय पाटील (वय 60, रा.तानाजीनगर, चिंचवड) असे फिर्यादीचे नाव आहे. या प्रकरणी उमेश राजाराम गायकवाड (वय-३५ रा. कात्रज) याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पाटील यांना त्यांची मारुती सुझुकी डिजायर (एमएच 14 सीएक्स 9263) मोटार विकायची होती. आरोपी उमेश व फिर्यादी यांच्यात मोटारीसाठी 3 लाख 50 हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला. उमेश याने पैसे देण्याच्या बोलीवर मोटार नेली. मात्र त्यानंतर पैसे व मोटार न देता फसवणूक केली. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम पुढील तपास करीत आहेत.