Pune : 16 हजार फुकट्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाची कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे मंडळात पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज, मिरज-कोल्हापूर सेक्शनमध्ये एप्रिल महिन्यात 16 हजार 106 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पुणे रेल्वे मंडळाने 2 कोटी 7 लाख 4 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पुणे मंडळात पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज, मिरज-कोल्हापूर विभागात रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. या अभियानात एप्रिल महिन्यात प्रवाशांची एकूण 37 हजार 779 प्रकरणे समोर आली. त्यामध्ये फुकट प्रवास करणा-या 16 हजार 106 फुकट्या प्रवाशांकडून 99 लाख 72 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ही कारवाई मंडल रेल व्यवस्थापक मिलिन्द देऊस्कर, अपर मंडल रेल व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली तिकीट निरीक्षक, रेल्वे सुरक्षा कर्मचा-यांच्या पथकाने केली. रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी अभियान नियमित सुरु आहे. प्रवाशांनी तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.