Moshi : कोयत्यासह 20 वर्षीय तरुणाला मोशी येथून अटक

एमपीसी न्यूज – कोयत्यासह एका 20 वर्षीय तरुणाला मोशी येथून (Moshi) अटक केली आहे. ही कारवाई एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुरुवारी (दि.8) केली आहे.

प्रशीक राजीव वाघमारे (वय 20 रा. मोशी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई नितीन आप्पा खेसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Hinjawadi : ब्रुनेई देशात जाण्यासाठी बनवलेले तब्बल 48 बनावट व्हिसा जप्त; हिंजवडी पोलिसांची कामगिरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कोणत्याही परवानगी शिवाय त्याच्या ताब्यात 250 रुपयांचा कोयता घेऊन फिरत होता. पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्याकडील कोयता जप्त केला व त्याच्यावर आर्म अक्ट अतंर्गत गुन्हा दाखल केला. एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

youtube.com/watch?v=rdFR0KCX25c

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.