Urse Toll Plaza Crime News : प्रवासादरम्यान पैसे, दागिने, मोबाईल असे सव्वा दोन लाखाचे साहित्य असलेली बॅग चोरीला

एमपीसी न्यूज – प्रवासादरम्यान पैसे, दागिने, मोबाईल असे सव्वा दोन लाखाचे साहित्य असलेली बॅग चोरीला गेली. हुबळी ते मुंबई बस प्रवासादरम्यान उर्से टोल नाका येथे 02 ते 03 एप्रिल दरम्यान ही घटना घडली.

याबाबत भावेश मुलचंद राठोड (वय 38, रा. हुबळी, धारवाड, कर्नाटक) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वोल्वो GA 06 T 7428 या बसमधून हुबळी ते मुंबई बस प्रवास करत होते. गाडी उर्से टोलनाक्याजवळ आल्यानंतर फिर्यादी यांची पैसे, दागिने, मोबाईल असे सव्वा दोन लाखाचे साहित्य असलेली बॅग चोरीला गेली. वाकड येथे या बसमध्ये चढलेल्या इसमाने ही बॅग चोरली असावी असा संशय फिर्यादी यांनी व्यक्त केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.