School Bus Accident: गिरवली घाटातील कालच्या स्कूलबस अपघात प्रकरणी बस ड्रायव्हरवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : गिरवली घाटातील काल झालेल्या स्कूलबस अपघातप्रकरणी बस ड्रायव्हरवर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मनीष बिनायक्या, वय 53 वर्षे, रा. मोशी यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी बस ड्रायव्हर लीलाधर लांडगे वय 25 वर्षे रा. काळेवाडी घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे यांच्या विरोधात पुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी लीलाधर लांडगे यांनी त्यांच्या ताब्यातील स्कूलबस नंबर एम एच 14 सी डब्ल्यू 35 53 ही अविचाराने,  निष्काळजीपणे चालवून बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात केला आहे. या अपघातात फिर्यादीस मानेला व छातीला मुक्का मार लागला असून मुख्याध्यापक सुरेश मुळे यांच्या डाव्या पायाच्या उजव्या हाताच्या मनगटावर तसेच डोक्याला मार लागून जखमा झाल्या आहेत.

तसेच बसमधील शिक्षक महिंद्र आवटे यांना व बस मधील 37 ते 38 विद्यार्थी यांच्या गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या जखमांसाठी व स्कूल बसचे नुकसानीस कारणीभूत झाला आहे. अपघात हा चालक लीलाधर लांडगे यांच्या चुकीमुळे झाला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बस मध्ये इयत्ता दहावीचे 19 विद्यार्थी, इयत्ता नववीचे 11 विद्यार्थी इयत्ता आठवीचे 13 विद्यार्थी व इयत्ता सातवीचा एक विद्यार्थी असे एकूण 44 विद्यार्थी प्रवास करत होते. त्यांच्यासोबत एक प्राचार्य, दोन शिक्षक, एक ड्रायव्हर व एक शिपाई सुद्धा प्रवास करत होते. असे एकूण 49 जण त्या बस मध्ये प्रवास करीत होते.
यापैकी पाच जणांवर साईनाथ हॉस्पिटल भोसरी येथे उपचार सुरू आहेत. तर दोन जणांवर मंचर सिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू  आहेत. नऊ जणांवर उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे उपचार सुरू आहेत. आठ जणांवर ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे उपचार सुरू आहेत. एकावर सार्थक हॉस्पिटल मंचर येथे सुरू आहे. दोन जणांवर डॉक्टर डोंगरे हॉस्पिटल घोडेगाव येथे उपचार सुरू आहेत. दोन जणांवर सिद्धी हॉस्पिटल मंचर येथे उपचार सुरू आहेत. असे एकूण 29 जणांवर उपचार सुरू आहेत. 20 जणांवर उपचार करून सोडण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.