Pune News : आगीत नुकसान झालेल्या भगतवाडी गावक-यांना ब्राम्हण महासंघाकडून मदतीचा हात

एमपीसी न्यूज – खडवासला येथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या भगतवाडी गावात रविवारी (दि. 14) पहाटे आग लागली. या आगीत पंधरा वीस घरे आगीच्या भक्षस्थानी पडले. आगीत नुकसान झालेल्या भगतवाडीतील गावक-यांना अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाकडून मदतीचा हात दिला आहे.

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या कोथरूड, वारजे शाखेच्या पुढाकार घेऊन चार तासात मदत उभी केली. भगतवाडी गावात महासंघाची टिम दाखल झाली व त्यांची विचारपूस केली. नुकसान झालेल्या गाक-यांना महासंघाच्या वतीने 95 किलो तांदूळ, कपडे, भांडी याची तातडीची मदत  देण्यात आली. यापुढे देखील मदत दिली जाणार असल्याचे महासंघाच्या वतीने सांगितले.

महासंघाच्या वतीने कार्याध्यक्ष मंदार रेडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा केतकी कुलकर्णी,  माधव तीळगूळकर, स्मिता इनामदार, जयश्री घाटे, श्रीकांत देशपांडे, विकास अभ्यंकर, अरुण जोशी, कुंदा बिडकर, शिल्पा महाजनी यांनी मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.